तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क आयुक्त तथा धाराशिव जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते डॉ. राजेश देशमुख यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
