धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धाराशिव हाफ मॅरेथॉन टीम सोबत जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी आज पहाटे 5:00 वाजता धाराशिव छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर हे 21 चे अंतर अवघ्या 2 तासात पूर्ण केले. सर्व मित्र परिवारासोबत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शेतकऱ्यावर आलेले दुष्काळाचे संकट यातून सावरण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना केली.
