भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम येथे नवरात्रोत्सवानिमित्त ‘जागर शक्तीचा सन्मान नवदुर्गांचा!' या संकल्पनेतून नवदुर्गा पूजन व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि त्यांना भविष्यात अधिक यश मिळविण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला परीक्षा , नवोदय परीक्षा ,शिष्यवृत्ती परीक्षा , एन . एम . एम. एस . परीक्षा यातील गुणवंत विद्यार्थिनी अशा विविध शालेय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणि गोड खाऊ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री किरण जाधव सर होते . त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थिनींनी आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री संतोष राऊत सर यांनी केले ,प्रशालेचे पर्यवेक्षक श्री बांगर सर यांनी आभार प्रदर्शन केले.
विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा, त्यांच्या यशाचा गौरव करणारा आणि स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा हा सोहळा आनंदात संपन्न झाला.
नवदुर्गांचा सन्मान, गुणवत्तेचा गौरव आणि स्त्रीशक्तीचा जागर! क्षण आनंदाचे सन्मान कर्तृत्वाचा!
श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम जागरशक्तीचा सन्माननवदुर्गांचा नवदुर्गापूजन नारीशक्ती विद्यार्थिनीगौरव शैक्षणिकउपक्रम अशाप्रकारे साजरा करण्यात आला.
