धाराशिव (प्रतिनिधी)-  अवैधरित्या इनोव्हा कार क्र. एपी-23 एल-2478 मध्ये वाहतुक करीत असलेला 24 गोण्यातील हाय कंपनीचे 1296 पुडे ज्याची किमत 9 लाख  7 हजार 200 रूपये व गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली कार किमत अंदाजे 7 लाख रूपये असे एकुण 16 लाख 7 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

दि. 16/10/2026 रोजी पहाटे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी पोलीस ठाणे उमरगा यांना गुप्त बातमीदार मार्फत हैद्राबाद येथुन एक गजगा रंगाच्या इनोव्हा कारमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतुक करीत असल्याची बातमी मिळाल्याने तलमोड चेक पोष्ट येथे नाकाबंदी लावण्यात आली. पहाटे 5 वाजण्याचे सुमारास बसवकल्याणकडुन एक इनोव्हा कंपनीची कार क्र. एपी-23 एल-2478 ही येत असल्याचे दिसुन आले. नाकाबंदी ठिकाणी सदर गाडी अडवुन पाहणी केली. कारचे पाठीमागील सीटवर पांढरे रंगाचे गोण्या भरल्याचे दिसुन आले. कार चालक मोहम्मद जमील मोहम्मद अहमद खान वय 32 वर्षे, रा. 1-28/1 मालरेड्डी, कोसगी मंडल, पोस्ट-कोसगी जि. महेबुबनगर ह.मु. शास्त्रीपुरम, राजेंद्रनगर मंडल जि. रंगारेड्डी (तेलंगणा) व त्याचा साथीदार अली खान मोहम्मद अली वय 27 वर्षे, रा. प्लॉट न. 8, नुरी नगर, बांडलागुडा, पोष्ट-केशोगिरी, बांडलागुडा मंडल, जि. हैद्राबाद (तेलंगणा) यांना गोण्यामध्ये काय आहे याबाबत विचारपुस केली. ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने पोलीसांना त्यांचा संशय आल्याने पोलीसांनी गोणी उघडुन पाहीले असता त्यामध्ये 'हाय' कंपनीचे गुटख्याचे पाकीटे असल्याचे दिसून आले. 

अन्न सुरक्षा अधिकारी, धाराशिव पल्लवी इंबडे यांनी दि. 16/10/2026 रोजी पो.स्टे. उमरगा येथे येवुन कारमध्ये मिळुन आलेल्या गुटखा सदृष्य अन्नपदार्थाची पंचनामा करून कारमध्ये मिळालेल्या 24 गोण्यातील 'हाय' कंपनीचे 1296 पुडे ज्याची किमत 9 लाख 7 हजार 200 रूपये व गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार क्र. एपी-23 एल-2478 किमत अंदाजे 7  लाख रूपये असे एकुण 16 लाख 7 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उमरगा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पो.नि. प्रल्हाद सुर्यवंशी हे करीत आहेत. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रल्हाद सुर्यवंशी, पोउपनि रामहरी चाटे, पोहेकॉ शिवलिंग घोळसगांव, पोको प्रविण नळेगावकर, पोको भागवत घाटे, होमगार्ड पुजारी, पवार, राठोड,  चौधरी यांच्या पथकाने केली आहे.


 
Top