भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी एफ एफ एस“ खत विक्री आराखडा“ हे हे ॲप आणले असून या ॲपमध्ये फार्मर आयडी, आधार कार्ड टाकून ते चालू केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची, जमिनीचे माहिती लगेच उपलब्ध होते. पिकाचे नाव, त्याचे क्षेत्र, लागणाऱ्या पोत्यांची संख्या, शेतकऱ्यांनी टाकायची आहे.
धाराशिव जिल्ह्यात दिनांक 22 ऑक्टोबर पासून खत खरेदीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला सदरील ॲप मध्ये आपली खताची मागणी नोंदवावी लागेल,मागणी नोंदवल्यानंतर गावातील सर्व दुकान ची यादी व त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठा याची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला पाहायला भेटेल त्याप्रमाणे दुकानाची निवड करावी लागेल, पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सदरील ॲपवर “क्यूआर“कोड येईल, सदरील कोड संबंधित दुकानदाराला दाखवून,स्कॅन केल्यानंतरच खत व पावती भेटेल, 10:26: 26,12 :32:16, 9:24: 24,20:20:0:13, हे खते मुबलक प्रमाणात भेटू शकतील परंतु युरिया आणि 18:46, एकरी फक्त दोन पोते मिळण्याची शक्यता आहे, याच दोन खतांना मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध असून अनेक शेतकरी सदरील खत खरेदी करण्यास प्राधान्य देतात अनेक वेळा पिकाला व जमिनीला युरियाची आवश्यकता ही नसताना फक्त खत स्वस्त भेटते म्हणून युरियाचा अतिरिक्त वापर होताना कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांना दिसून आले आहे
फॉस्फरस हे भारताला प्रदेशातून आयात करावे लागते अंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशात युद्ध जन्य परिस्थिती असल्यामुळे कच्चा माल खरेदी व वाहतूक करणे अत्यंत जखमीचे झाले आहे, त्यामुळे या दोन्ही खतावरील खरेदीला या ॲपद्वारे लगामच लावला आहे असे म्हणावे लागेल.