धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे पिंपळगाव (कोठावळे) ता.कळंब जि.धाराशिव गावातील ई-पीक पहाणी होत नसलेबाबत तसेच सात-बारा व आठ-अ ऑनलाईन दिसत नसल्यामुळे पीककर्ज, पीक विमा तसेच इतर सवलतीपासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्याबद्दल आपण तत्काळ दखल घेवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती संयोजक संजय पाटील दुधगांवकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे केली आहे. 

धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. याबाबतीत शेती पीकाची ई-पीक पहाणी करत असताना मौजे पिंपळगाव कोठावळे येथे 1142 गटापैकी 600 गट ऑनलाईन दिसत नाहीत, ई पीक पहाणी झाली नाही, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, तांत्रीक अडचणीमुळे ऑनलाईन पोर्टल बंद असल्याने सात-बारा व आठ-अ उपलब्ध होत नाहीत. या संदर्भात  जिल्हाधिकारी, धाराशिव तथा सर्व संबंधीतास वेळवेळी प्रत्यक्ष भेटून व लेखी कळविण्यात आले आहे. याबाबत पिंपळगाव कोठावळे येथील ग्रामस्थांना सर्व सोई-सुविधा व मदतीपासून वंचीत राहुनये यासाठी संबंधीतांना ताबडतोब आदेशीत करावे. मदतीपासून शेतकरी वंचीत राहील्यास याची सर्व जबाबदारी शासनाची राहील अन्यथा याविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती, संयोजक, संजय पाटील दुधगांवकर यांनी केली आहे. 


 
Top