भूम (प्रतिनिधी)- भूम-पारडी रोडवरील हाडोग्री गावाजवळ तीव्र उताराच्या वळणावर सोयाबीन वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात मध्य प्रदेशातील चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवार, ता. 23 ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

शहाबाद जाकीर मन्सुरी (वय 29, रा. आझाद गल्ली मार्ग, ता. धर्मपुरी, जि. धार, मध्य प्रदेश) असे मृत चालकाचे नाव असून, ट्रक क्रमांक एमएच 18 बीजी 6553 असा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गव्हाणे करीत आहेत.


 
Top