भुम (प्रतिनिधी)- पवनचक्की प्रकल्पाच्या कथीत दडपशाहीच्या विरोधात, येथील शेतकऱ्यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत, भूम जातेगाव रस्तावर रोको केला. सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून त्यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या क्षेत्र रस्त्यांचा वापर करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांशी रीतसर करार करणे आवश्यक आहे. कराराशिवाय कंपनीच्या वाहनांची वाहतूक करू नये अशी ठाम मागणी आंदोलन शेतकऱ्यांनी केली.
महसूल व पोलीस प्रशासन ने एकतर्फी कारवाई न करता ग्रामस्थ ,तसेच कंपनीचे प्रतिनिधींच्या समोर प्रत्यक्ष चर्चा करावी. समस्या जाणून घ्यावी, सर्व कागदपत्रे, मालकी हक्क, आणि वस्तुस्थितीची पूर्ण शहंशा करून दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकावे, व नंतर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यापूर्वी फक्त कंपनीच्या तक्रारीवरून अनेक शेतकऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ईट ग्रामस्थांकडून एक जुटूनी दिलेला हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला आहे. शेवटी मंडळ अधिकारी कांबळे यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
सदरील आंदोलनात सर्व शेतकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील देशमुख,माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख,श्रीमंत डोके, आनंद डोके, राजाभाऊ हूबे, हनुमंत देशमुख, समर्थ हूबे यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
