धाराशिव (प्रतिनिधी)-   येथील उज्वला कुलकर्णी यांच्या पुढाकाराने व धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन च्या संयुक्त विद्यमाने अमेरिका येथील शिल्पा अजय डांगरे, पुणे येथील अपर्णा पुराणिक व अश्विनी कुलकर्णी या भगिनींनी याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोडसरवाडी व गोवर्धनवाडी येथील विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप उज्वला कुलकर्णी यांच्या घरी निसर्गरम्य वातावरणात करण्यात आले. 

बॅग वाटप करण्यापूर्वी साबुदाणा वडे, चिप्स चिक्की आणि आईस्क्रीम असा अल्पोपहार देण्यात आला!नंतर स्कुल बॅग वाटप करण्यात आले, स्कुल बॅग घेताना विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. या कार्यक्रमासाठी फेडरेशन च्या अध्यक्षा अनुराधा तोडकरी,प्राचार्या अनार साळुंके, उपाध्यक्षा उज्वला मसलेकर, सचिव अंजली देशपांडे, सह कोषाध्यक्ष उर्मिला तोडकरी, संगीता काळे, नीता कठारे  उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी विदयार्थ्यांना आणण्याची जबाबदारी त्यांच्या शिक्षिका जयश्री हुलसुरकर व हुलसूरकर या उभयंतानी पार पाडली. प्रत्यक्ष हजर न रहाता आपल्या गावी सामाजिक बांधिलकी ची जणी व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम कौतुकासद आहे. हा उपक्रम कार्यक्रमा अंतर्गत खेळीमेळीने व मधुकर कुलकर्णी  यांच्या सहकार्याने व उत्साहात पार पडला.


 
Top