भुम (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंबळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी अनुष्का गोकुळ तांबे हिने जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल भूमच्या गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

त्यावेळी त्या म्हणाल्या की अनुष्काचे यश हे तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. चुंबळी शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, क्रीडा स्पर्धां मधून यश मिळवून अनेक वेळा तालुक्यात नावलौकिक मिळवला आहे. तसेच बिटस्तरीय स्पर्धेत जमशेद पठाण व प्रिया बनगर यांचाही सत्कार करण्यात आला .हा कार्यक्रम शालेय विकास बचत गट चुंबळी यांनी घडवून आणला .यामध्ये वालवड केंद्राचे केंद्रसमन्वयक मोरे यांनी सत्कार केलेल्या सर्व मुलांना नवनीतच्या डिक्शनरी भेट दिल्या. कार्यक्रमास अनिता जगदाळे गटशिक्षणाधिकारी भूम, सूर्यकांत साळुंके कार्यालयीन विस्तार अधिकारी, सोमनाथ टकले विस्तार अधिकारी बीट पाथरूड, संदिप मोरे केंद्र समन्वयक केंद्र वालवड, चुंबळी गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शालेय विकास बचत गटाचे अध्यक्ष शिकंदर सय्यद, सदस्य,व पालक,शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक इत्यादी उपस्थित होते.


 
Top