भूम (प्रतिनिधी)- गोवंशीय जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना वाहनांत दाटीवाटीन े कोंबून वाहतूक केल्याचा प्रकार भूम-पारडी रस्त्यावरील पांढरे देवी मंदिराजवळ उघडकीस आला. भूम पोलिसांनी गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी पहाट े 5.35 वाजण्याच्या सुमारास कारवाई करत 35 जर्सी गायींची वासरे आणि 10 जर्सी गायी, अशी एकूण 45 जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी अभिमान भगवान मंडलिक (वय 32, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युसुफ सुदबुद्दीन सय्यद (वय 27, रा. खडकत, ता. आष्टी, जि.बीड) यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित जनावरांची आयशर वाहन क्रमांक एमएच 23 डब्ल्यू 2670 आणि पिकअप क्रमांक एमएच 08 एच 7335 या वाहनांतून वाहतूक केली जात होती. जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना दाटीवाटीन े भरल्याच े पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत जनावरांची किंमत सुमारे 1 लाख 35 हजार रुपये असून, वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत 6 लाख 35 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भूम पोलिसांनी सरकारतर्फे दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, 1960 मधील कलम 11 (1) (ड), 11 (1) (ई), तसेच संबंधित गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील कलम 5 (ब) व 9 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. जनावरांची अशा प्रकारे दाटीवाटीन े वाहतूक केल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.


 
Top