तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. मुख्यमंत्रीपदी  सिद्धी भोरे यांची निवड झाली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. खडके यांनी पहिले मतदान करून मतदानास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी या पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडण्यात आले. 'आनंददायी शनिवार' या उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले... या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश खडके, प्रवीण पडवळ, शांता सलगर, जयश्री बुकन,सुकुमार कचार, पूजा कचार यांचे सहकार्य लाभले. सर्व उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः सहभागी होऊन  पार पडला.. मतमोजणी करण्याचे काम माहेश्वरी कचार, श्रावणी नागलबोने ,जयंत बुकन व प्रशांत इटबोने या विद्यार्थ्यांनी पार पाडले.

मंत्रिमंडळ- मुख्यमंत्री -सिद्धी भोरे, उपमुख्यमंत्री -कुमार आवले, शिक्षण मंत्री _श्रद्धा भोसले, अन्नपूर्णा विठूबोने, आरोग्य मंत्री -कार्तिक नागलबोने, स्वच्छता मंत्री- गायत्री चामे, पर्यावरण मंत्री- सिद्धांत कचार, ओम विठुबोने, सांस्कृतिक मंत्री -शितल आवले, क्रीडा मंत्री -मल्हारी बंडे, अर्थमंत्री -स्वरा भोरे, अनुष्का नागलबोने, पाणीपुरवठा मंत्री -शिवदीप शिंदे.

 
Top