धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील काकडे प्लाटिंग स्थित जिजाऊ महिला बचत गटा मार्फत प्रशालेतील गरजू विदयार्थ्यांना 90 स्कूल बॅग तसेच 50 डझन रजिस्टर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, केशव जाधव  व जिजाऊ महिला बचत गटाच्या स्वप्नाली बोबडे, मीरा चौधरी, वेदा अय्यंगर, सुवर्णा शिंदे, अश्विनी देशमुख, मुक्ता नरळे सेवानिवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते एल. बी. गोरसे यासोबतच उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक आर.बी. जाधव, शेषनाथ वाघ, के.के. पाटील, बी.एम. गोरे, बी. बी. गुंड, कुमार निकम तसेच विवेक कापसे, अमित लोमटे व या कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक आयोजक आर. जी. बोबडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले.

 
Top