धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये दिवाळी सणानिमित्त इ.5वी ,6 वी विभागात आकाश कंदिल बनविणे  स्पर्धेमध्ये तब्बल 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

त्यापैकी बक्षीस पात्र इ.5 वी श्रेयश राठोड, वीर बेले, श्रेयश कोळेकर, उजेर शेख, साईराज पुरंदरे, सौख्या निंबाळकर, ऋषिका गुरव, वैष्णवी महानवार, पूर्वी बनसोडे, कविशा तांबारे, मृणाल फिसरेकर, इ.6 वी स्वराली घोडेराव, कार्तिकी पोते, अन्वी लिंगदाळकर, जानवी कांदे, स्वानंदी माळी, मशायक अमीरा, सुहान मुजावर, सकलेन औसेकर, समर्थ ढवाण, रुद्र गंगणे, यश पंगुडवाले, अलमगीर मोमीन यांनी अनुक्रमे बक्षीस पटकावले. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी  मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे , उप मुख्याध्यापक प्रमोद कदम, 6 वी पर्यवेक्षक राजेंद्र कदम उपस्थिती होती. कार्यानुभव शिक्षिका पी.डी. परतापुरे यांनी परिक्षण केले व सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी 5 वीचे पर्यवेक्षक शेषनाथ वाघ, सहशिक्षिका व्ही. एल. पवार, एस.डी.बीरगड,  आर.आर.जाधव सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला आकाश कंदिल दिपावली सणात निवासी लावणार असा संकल्प केला.

 
Top