मुरूम (प्रतिनिधी)- केसरजवळगा, ता. उमरगा येथील श्रीपीएम केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुनील नरसिंग राठोड यांच्या 42 व्या  वाढदिवसानिमित्त आणि रोटरी क्लब मुरूम सिटीच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी हिताच्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व 235 विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व खाऊचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना दैनंदिन वापरातील उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. वाढदिवस केवळ वैयक्तिक स्तरावर साजरा न करता सामाजिक दायित्व म्हणून विद्यार्थ्यांच्या हितासाठी साजरा केल्याबद्दल उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी सत्कारमूर्ती सुनील राठोड यांचा रोटरी क्लब आणि जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान डॉ. महेश मोटे, बिरबलसिंग राजपूत, माजी सरपंच अमोल पटवारी आणि जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना उपयुक्त वस्तूंचे वाटप केल्याने सामाजिक बांधिलकी दृढ होते आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच शिक्षणासोबतच आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अजित शेख, रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, मल्लिकार्जुन बदोले, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. महेश जिरोळे, डॉ. महेश स्वामी, माजी सचिव कल्लप्पा पाटील, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, शिवकुमार स्वामी, शिवशंकर पाटील, बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक बालाजी भोसले, उपसरपंच जयपाल राजपूत, चव्हाण, संजय कांबळे, चिंचोळे, बदोले , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या लक्ष्मीबाई राजपूत, रमा सुरवसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सहशिक्षक विनोद सूर्यवंशी, बालाजी चव्हाण, प्रमोद सागरे, संजीव भोसले, सहदेव बोडरे, सुनीता चव्हाण, पूजा जाधव आणि निकिता रायभोगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सूर्यवंशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बालाजी भोसले यांनी मानले.


 
Top