तुळजापूर (प्रतिनिधी)- अभियंता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने तुळजापूर व धाराशिव विभागातील विविध स्तरांवर कार्यरत अभियंता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळ कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी, तुळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे, धाराशिव विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे, तुळजापूरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक कोतले तसेच धाराशिवचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तुळजापूर व धाराशिव विभागातील उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांचाही संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करून अभियंता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे मंडळ अध्यक्ष बापू जगदे, मंडळ सचिव नूर शेख, अमीर शेख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top