परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील ब्रम्हगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभा घेऊन शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. पालकांच्या उपस्थितीत नूतन समितीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सचिन राजेश गायकवाड तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिवाजी गवळी यांची निवड झाली.

नूतन समितीमध्ये महादेव गोवर्धन हिंगणकर,  मयूर अशोक काजळेकर, नितीन कुंडलिक ओव्हाळ, सौ.अर्चना अमोल गायकवाड, सप्रियंका ज्ञानेश्वर क्षीरसागर, सौ.दिक्षा दत्तात्रय जाधव, सौ.रोहिणी सुधीर काळे व सौ. कोमल विशाल शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. सुषमा सुभाष चव्हाण तर सचिव म्हणून मुख्याध्यापक श्री. लहु नागनाथ मासाळ यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख  प्रकाश ठवरे, विषय शिक्षक हणुमंत कांबळे, माजी अध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, माजी उपाध्यक्ष महादेव हिंगणकर, अंगणवाडी सेविका सौ.सविता येवले, अमर ओव्हाळ,  दत्तात्रय जाधव, शांतीलाल ओव्हाळ तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन समिती कटिबद्ध नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळेतील भौतिक सुविधा सुधारणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे तसेच पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top