तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना हे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना किमान 50 हजार रुपये प्रतिएकर सानुग्रह अनुदान अथवा पीक विमा, कर्जमाफी, कृषी पंपांचे वीज बिल माफ करणे, चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करणे, तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. आठ दिवसांत दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू न केल्यास जिल्हाभर रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 
Top