परंडा (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधिक्षक रितू खोकर परंडा पोलीस स्टेशन येथे आले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीरदादा सुरवसे तसेच सामाजिक कार्यकर्ते मक्सुद पल्ला उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याबाबत चर्चा करून विविध सामाजिक विषयांवर विचारविनिमय केला. कार्यक्रमास रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 
Top