धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले, गवळी गल्लीतील, धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या श्रीच्या पूजा विधीसाठी व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या सन्मानासाठी जिल्हाधिकारी व दंडाधिकारी कीर्ती किरण पूजार, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर व माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत करण्यात आले . आजचा दिन मराठवाडा मुक्ती दिन व जागतिक रुग्ण सुरक्षित दिन या दिनाचे महत्त्व जाणून स्वातंत्र्य संग्राम सेनानी भास्करराव नायगावकर वय शंभर वर्षे पूर्ण झालेली व ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिलेले.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असणारे त्यांच्यापासून राष्ट्रनिष्ठा, भक्ती, निस्वार्थ सेवा देऊन राष्ट्रीय एकात्मतेची, जनजागृतीचे काम करणारे, अभियंता भारत मसलेकर, ॲड. रवींद्र कदम, डॉ.अजित नायगावकर धाराशिव शहरात दाताचा दवाखाना सुरू करून सुवर्ण महोत्सवी वर्ष व स्वयंसेवक, दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थिनी अर्पिता वाडकर, कामगार न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ॲड. दीपक पाटील, कीर्तन महोत्सवातून 95 संतांची पूजन,माता-पित्यांचे अमृत महोत्सवी पूजन,देव व देशभक्ती, संस्कृती, अध्यात्म, सदाचार, सन्मार्ग असा संदेश देणारे हभप व स्वयंसेवक ॲड. गजानन चौगुले, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, 1964 पासून हलगी वाजविणारे तालात आणि सुरात लेझीम दीडशे खेळाडूंना खेळायला लावणारे, हलगी वादकगायकवाड मेसा, यांच्या शुभहस्ते पूजा विधि व त्यांनी त्यांच्या क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कीर्ती पुजार, विद्याचरण कडवकर ,नानासाहेब पाटील यांचा सन्मान व सत्कार मनमत पाळणे,प्रा. गजानन गवळी,राजकुमार दिवटे, गिरीश पाळणे, आदित्य हंबीरे,विद्यानंद साखरे, वरून साळुंखे इत्यादींच्या शुभहस्ते करण्यात आला.

सन्मान व सत्कार मंडळाच्या श्री ची प्रतिमा, शेला व श्रीफळ देऊन करण्यात आला. मंडळाचे कार्य गेली 62 वर्षाचे निमंत्रण श्रीयुत पुजार यांनी आपल्या मनोगतातून पत्रिकेतला अहवाल व लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या उद्दिष्टानुसार राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकोपा व विधायक कार्याला वाहून घेणारे मंडळ आहे. ज्वलंत समस्येवर आधारित हलते देखावे सादर करून जनजागरण, जनप्रबोधन निस्वार्थपणे ,बिना मानधन व कसलाही मोबदला न घेता असे देखावे काशिनाथ दिवटे करतात. देखावे विकत आणत नाहीत किंवा विकले जात नाहीत. पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्त प्लास्टिक मुक्त कार्य आहे. 

 वाद्य वाजवणारे किंवा इतर छोटी मोठी सर्व कामे निस्वार्थ ,सेवावृत्ती ने युवक करतात .नशा मुक्त भारत अभियान, स्वच्छता अभियान,  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व विविध उद्दिष्ट व ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची वृत्ती मी दोन वर्षात जाणली आहे . समाजावर भार न टाकता हेच मंडळाचे आर्थिक दृष्ट्या नियोजन. आजच्या कालावधीत महत्त्वपूर्ण ठरते. धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे अशा वेळी आपल्यासारख्या  मंडळांची वेळोवेळी मदतीची गरज भासणार आहे आपणही विविध व कार्यक्रमात आपला सहभाग असावा. व्यसनमुक्ती युवक व नशा मुक्ती भारत याची शपथ घेतली गेली व श्री च्या चरणी पाऊस भरपूर पडू दे व बळीराजा सुखी होऊ दे तरच भारत देशातील सुख समृद्धता व संपन्नता राहू शकते अशी प्रार्थना हात जोडून सर्वांनी केली . हे मंडळ अनुकरणप्रिय व शिस्तप्रिय आहे गेली दोन वर्षात दिसून आले असे पूजार म्हणाले. यावेळी विद्याचरण कडवकर आरडीसी, नानासाहेब पाटील, स्वातंत्र्य सेनानी भास्करराव नायगावकर, स्वातंत्र एडवोकेट कदम, उमेश राजे निंबाळकर, एडवोकेट गजानन चौगुले, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

मंडळाच्या श्री ची पूजा विधि व विविध देवतांच्या आरतीने, भक्तिमय व प्रसन्नतेच्या वातावरणात मंत्र उच्चार आणि व शंख,वाद्य व घंटीच्या निनादात काशिनाथ दिवटे यांच्या  मंजुळ व सुरेल आवाजात संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लहान थोर सर्व गणेश भक्तांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार भालचंद्र हुच्चे व एडवोकेट अमोल दिवटे यांनी मानले .फटाक्याच्या व शोभेच्या दारूच्या आतशबाजी मध्ये समारोप करण्यात आला.

 
Top