तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी हे अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याचा दावा करत मराठा क्रांती ठोक मोर्चा व सकल मराठा समाज, तुळजापूर यांच्या वतीने बुधवारी (दि. 2) तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी व ‌‘बोंब मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारमधील विविध मंत्र्यांच्या विरोधात जाहीर घोषणा करून त्यांच्या नावाने बोंब मारण्यात आले. 

याबाबत तुळजापूर तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तात्काळ ठोस निर्णय घेऊन जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आंदोलन म्हणाले की ही सुरुवात आहे या पुढच्या आंदोलन महाराष्ट्र शासनाला तेलवणारे आंदोलन नसेल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले असून, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या मनात सरकारविषयी रोष निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. सरकारने तात्काळ ठोस पावले उचलून मराठा समाजाच्या मागण्यांवर मार्ग काढावा आणि जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडवावे, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सरकारच्या नावाने बोंब मारून आंदोलन करण्यात आले. “सरकारने यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top