भूम (प्रतिनिधी)- मंडळांनी सर्व आवश्यक परवानग्या वेळेत घेऊन शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. डीजे आणि लेझरचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूमचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते यांनी केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. गणेशमूर्तीची स्थापना करताना पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य द्यावे, मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या देखाव्यांची लांबी व रुंदी नियमांनुसार असावी, तसेच उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी, असेही पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा आणि शांतता राखून साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मंडळांचीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस भूम शहर व परिसरातील 110 ते 120 नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते. एपी आय गणेश खांडे, पी एस आय बर्डे तसेच पोलीस अंमलदार चेडे, यादव, शिंदे, कोरे व कवडे यांची उपस्थिती होती.

 
Top