तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आना-पना मार्गदर्शक कानिफनाथ देवकुळे यांनी विद्यार्थ्यांना तसेच सर्व शिक्षकांना आना पना,  ध्यानधारणा याबद्दल माहिती दिली व प्रात्यक्षिकही दिले. 

या उपक्रमामध्ये महाराष्ट्र संत विद्यालयाचे सर्व शिक्षक हे देखील सहभागी होते. जीवनातील अनेक समस्यांचे मूळ कारण न शोधता आनापनामार्फत आपण आपल्या मनावर इंद्रिये वर ताबा मिळवणे आवश्यक आहे असे देवकुळे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यानंतर इयत्ता नववी क मधील विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार केला. याप्रसंगी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी शिक्षकाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक  बेदरे जे. के., पर्यवेक्षक  बळवंतराव एस. एस., रणदिवे ए. एन.,  काणेकर एम. बी., शितोळे एम.एन. तसेच  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top