धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात प्रथमच पीक पाहणी प्रक्रियेत अत्यंत वेगळ्या आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. सद्यकाळात पावसातील सलग 32 दिवसांच्या येत आहे. सलग 32 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे स्पष्टपाने दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारकडे पाठविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पिक पाहणीत आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब अमलात आणला आहे. अशी माहिती दिली आहे.
कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, आयआयटी व प्रशासकीय तज्ञांच्या पथकाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली असून, पीक कापणी प्रयोग लवकर होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी केवळ कृषी व महसूल विभागाचे अधिकारीच नव्हे, तर कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि मुंबई आयआयटी मधील तज्ज्ञ सल्लागारांची विशेष टीम नेमण्यात आली आहे. हे सर्व तज्ज्ञ प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत असून, त्यांचा अधिकृत अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला सादर केला जाणार आहे. या महत्वपूर्ण आणि वस्तुनिष्ठ अहवालामुळे प्रत्यक्ष नुकसानीचा स्पष्ट अंदाज येण्यास मदत होणार आहे.32 दिवसांच्या सलग पावसाच्या खंडामुळे फुले सुकून गेली असून शेंगा व दाणे अतिशय कमी प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्याचे प्रथमदर्शनी निश्चित झाले आहे. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या निकषांनुसार मिळणारे नुकसान लवकरात लवकर कसे मिळवता येईल, यासाठी शास्त्रज्ञ आणि आयआयटी तज्ञांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या पाहणीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
