तुळजापूर (प्रतिनिधी)- विघ्नहर्ता तरुण मंडळ, अपसिंगा रोड, तुळजापूर यांच्या वतीने रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता शिक्षक कॉलनी परिसरात सामाजिक उपक्रमांतर्गत व. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय सर गंगणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांच्यासह शशी आप्पा, ज्योत नन्नू दादा, साठे अण्णा, भाई शिरसागर, वनील हंगरगेकर, राहुल पवार, रवी प्रताप, बालाजी नाईकवाडी, उत्कर्ष डोंगरे, प्रमोद भोरे तसेच विघ्नहर्ता तरुण मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उपक्रमांसोबत सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत मंडळाने वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प केला.“एक झाड लावा, अनेकांचे जीवन वाचवा” या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणासारखा उपक्रम राबवल्याबद्दल विघ्नहर्ता तरुण मंडळाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 
Top