तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी रामदारातील पाणी प्रकरणी केलेल्या वक्तव्य पार्श्वभूमीवर भाजपाने रविवारी त्यांच्या प्रतिमेस जोडो मारवा आंदोलन केले होते त्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे साहेब यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रमुख शामल ताई वडने पवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कानडे शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, जिल्हा समन्वयक शाम भाऊ पवार, तालुका संघटक कृष्णार्थ मोरे माजी शहरप्रमुख सुधीर जी कदम, बापूसाहेब नाईकवाडी, शहर संघटक अर्जुन आप्पा साळुंके, युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे ,नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पूदाले, बाळकृष्ण घोडके उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, संजय भोसले, सरदार सिंग ठाकूर, रोहित चव्हाण, प्रदीप मगर, महादेव पवार, सिद्धाराम कारभारी, ग्रामपंचायत सदस्य सोनाली पांचाळ, बालाजी पांचाळ, चेतन बंडगर, सौदागर जाधव, दत्ता भोसले, बालाजी डांगे, धुळप्पा रक्षे, शंकर गव्हाणे, छत्रे, सह मकरंद भालेराव , शिवसेनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
