धाराशिव (प्रतिनिधी)- अनेक दिवस पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यासाठी सोमवारी (दि.7) धाराशिव-सोलापूर सिमावर्ती भागातील चिखर्डे ता. बार्शी येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव दुधगावकर यांनी आंदोलनात सहभाग नोंदवत सर्वत्र तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान देण्यात यावे, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
