परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील डोमगावचे रावसाहेब चव्हाण यांनी सातबारा उतारा मिळावा यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे.

परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या सूचनेवरून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांनी उपोषणकर्ते चव्हाण यांची आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेतली. परंडा तहसीलदार व संबंधित अधिकारी यांचे समवेत दूरध्वनी वरून संपर्क करत उपोषणकर्ते रावसाहेब चव्हाण यांचे समाधान करून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. यावेळी घनश्याम शिंदे, गणेश शिंदे उपस्थित होते.

 
Top