परंडा (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाजाने गुरुवारी दि.3 रोजी  सकाळी 11 वा. परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन व परंडा बंदचे आवाहन केले आहे. याबाबत बुधवारी दि.2 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. 

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दि. 29 ऑगष्ट पासून उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या प्रकृतीची तातडीने दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन समाजाच्या मागण्यांची पूर्तता करावी.

प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत . मराठा समाजाला आरक्षण द्यावे.कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तत्काळ गतिमान करावी. सरकारी नोकरभरतीमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ लागू करावा. मनोज जरांगे पाटील यांच्याशी शासनाने तातडीने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा.

मराठा समाजावर होणारा अन्याय थांबवून शासनाने आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका जाहीर करावी.मनोज जरांगे पाटील यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची तातडीने दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. गुरुवारी दि.3 रोजी सकाळी 11 वा. रस्ता रोको आंदोलन तसेच परंडा शहर व तालुका बंद ठेवत आहोत. सरकारने येत्या दोन दिवसात दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली.


 
Top