धाराशिव (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी व समाजाच्या मागण्या तत्काळ मंजूर करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील चिखली चौरास्ता येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. 

सकल मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी 11 वेळेस उपोषण केले आहे. परंतु वेळोवेळी सरकारने फसवे जीआर देवून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून परत एकदा आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने तत्काळ मागणी मान्य करून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याचा प्रयत्न करावा असे निवेदनात म्हणण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. 


3 सप्टेंबरला धाराशिव जिल्हा बंद

मनोज जरांगे पाटील याचा उपोषणाचा सहावा दिवस असताना देखील सरकारने कोणतही हालचाल केली नाही. त्याच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाज धाराशिव यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधव, शैक्षणिक संस्था, वाहन चालक, कामगार तसेच समाज बांधवांनी बंदमध्ये सहभागी होवून मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीला पाठिंबा द्यावा असे आवाहन सकल मराठा समाज धाराशिव यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

 
Top