धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा जनता विकास परिषदेची जिल्हा कार्यकारणीची बैठक दिनांक 21 सप्टेंबर रोजी संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष सुरेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी भूम, परंडा, वाशी ,लोहरा,उमरगा, या तालुका कार्यकारणी निवड करण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीत संघटनेवर महिला प्रतिनिधी म्हणून ज्योती बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये धाराशिव येथे एक दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्याचे ठरवण्यात आले. तसेच संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ सोमनाथ रोडे यांना राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठान लातूरच्या वतीने सरांनी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय सचिव प्रा अर्जुन जाधव ,सागर जाधव, विलास शिंदे, व्हीएस गायकवाड, प्रा नवनाथ पवार ,इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.