धाराशिव (प्रतिनिधी)- कामेगाव (ता.धाराशिव) येथे 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात देनंदिन विविध धार्मिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शुक्रवारी (दि.4) गावात उभारण्यात आलेल्या भव्य अशा विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना कार्यक्रम विधीवत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास गावासह पंचक्रोशीतील नागरीक तसेच लेकमाता यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावल्यामुळे कामेगाव नगरी ही भक्तीमय वातावरणात न्हाहून निघाली.

कामेगाव येथे 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत आयोजित सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणून हभप. बाबुराव महाराज जावळे, नवनाथ महाराज चिखलीकर हे होते. तर कलशारोहण कार्यक्रम दिनकर बाबा महाराज नायगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. तत्पूर्वी गावातून भव्य अशी विठ्ठल रुक्मिणी मुर्ती व कलशाची मिरवणूक काढण्यात आली. या सप्तहात हभप बोंडगे महाराज माळकुंजी, नवनाथ महाराज चिखलीकर, हरीहर महाराज केज, हभप विठ्ठल महाराज दिवेगांवकर, वेभव महाराज खरवळकर, समाधान महाराज मते, संदीपान महाराज हासेगावकर यांची कीर्तन सेवा झाली. तर रविवारी (दि.6) हभप जयवंत बोधले महाराज (पंढरपूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्तहाची सांगता झाली. या सप्तहात हरीजागर जायफळ, पाडोळी, बिरवली, सांगवी, आंबेवाडी, मासुर्डी, येवती, मेंढा, समुद्रवाणी, लासोना, सारोळा, एकंबी, राजुरी, घुगी, दारफळ, दाउतपूर, बेंबळी, आरणी, भंडारवाडी, इर्ला येथील भजनी मंडळांचा झाला. याशिवाय या सप्तपहात पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, नामजप, हरिपाठ आदी देनंदिन कार्यक्रम उत्साहात पार पडले. या सप्ताहात मृदंगाचार्य म्हणून तात्या टिंगरे, मूर्ती स्थापनेसाठी गुरुतात्या स्वामी, गिते महाराज, चोपदार धनंजय कदम, काकडा भजन राघु भोंग, बालाजी भोंग, नवनाथ चव्हाण व भजनी मंडळ कामेगाव यांनी काम पाहिले. सात दिवस चालेल्या या सप्तहात समस्थ गावकयांनी मोठे परिश्रम घेतले.


पंचक्रोशीतील भव्य अशा मंदिराची उभारणी

धाराशिव तालुक्यातील कामेगाव येथे भव्य अशा विठ्ठल रुक्मिणी मंदिराची लोकप्रतिनधी व ग्रामस्थ यांच्या स्वर्चातून उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरासाठी मागील वर्षाभरापासून काम सुरु होते. उत्कृष्ठ कारागीर यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.4) याठिकाणी नवीन मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना कार्यक्रम विधीवत उत्साही वातावरणात संपन्न झाला. त्यास पंचक्रोशीतील नागरिकांसह गावच्या लेकमांतांनी मोठी हजेरी लावली होती. सदरील मंदिर हे पंचक्रोशीतील भव्य असे मंदिर म्हणून ओळखले जात आहे.

 
Top