तेर (प्रतिनिधी)- तेर येथील सातत्याने विजपुरवठा खंडित होत असून विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना अजित कदम, अविनाश आगाशे व नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

तेर ऐजी ची लाईट कमी दाबाने मिळत असल्याने शेती पिकाचे नुकसान होत आहे.तसेच कमी दाबामुळे विद्युत पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे.वारंवार लाईट जाणे,जंपिंग तुटणे,एका दिवसाला साडेपाच तास सुद्धा लाईट मिळत नाही.तरी आम्हाला पूर्ण क्षमतेने तेर ऐजी ला लाईट कमीतकमी सहा तास तरी देण्यात यावी.पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा नाही झाल्यास तेर येथील महावितरण कार्यालयास 21 सप्टेंबर ला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल.याची महावितरण कार्यालयाने नोंद घ्यावी असे निवेदनात  नागरिकांनी  नमूद केले आहे.निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय, धाराशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोकी,उपअभियंता महावितरण कार्यालय,तेर यांना देण्यात आलेल्या आहेत.


 
Top