तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथे महालक्ष्मी उत्सवानिमित्त सुनीता रामचंद्र शेंद्रे यांनी आपल्या निवासस्थानी आकर्षक धार्मिक देखावा साकारला आहे. महालक्ष्मीसमोर श्री शंभू महादेव मुद्गुलेश्वर महाराजांचा ‘महाकाल' अवतार अत्यंत देखण्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे.
या देखाव्यामध्ये धार्मिक वातावरणासोबत आकर्षक सजावट व कलात्मक मांडणी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. देखावा पाहण्यासाठी महिला, बालकांसह भाविक व नागरिकांची मोठी गर्दी होत असून, उत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या धार्मिक देखाव्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
