भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धाराशिव  जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह इतर मागण्यासाठी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भूम तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

प्रशासनास दिलेल्या निवेदनाला असे म्हटले कि, मराठवाड्याच्या विकासासाठी दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे 47 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र एक वर्ष उलटूनही या घोषणांची अमलबजावनी झालेले नाही मराठवाड्याच्या जनतेच्या प्रश्नावर केवळ प्रश्न आणि आश्वासनांचा पाऊस पडला जात असून, प्रत्यक्षात मात्र विकास कामे रखडलेले आहेत. आज शेतकरी दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये हाल काढत आहे. अपुरा पाऊस, वीजेचाही कमी दाबाचा विज पुरवठा,पिक विम्यातील त्रुटी, मराठवाडा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा. पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व दुष्काळी मदत द्यावी. तसेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला गती देऊन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळून द्यावे. भूम तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवणे तसेच धाराशिव येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणे या मागण्यांवर तातडीने कारवाई करावी. पिक विमा योजनेतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी. केवळ उपग्रहाचे आधारे पीक उत्पादन निश्चित न करता प्रत्यक्ष पीक पाहणे व शास्त्रीय निकषांचा वापर करावा. स्मार्ट मीटरची सक्ती ग्राहकांच्या तक्रारी महिलांच्या एसटी प्रवासा संदर्भातील आवश्यक अटी याबाबत शासनाने जनतेच्या हिताच्या निर्णय घ्यावा. मराठवाड्यातील जाहीर केलेल्या 47 हजार कोटी रुपयांच्या पॅकेज मधील किती निधी प्रत्यक्ष खर्च झाला कोणती कामे पूर्ण झाली आणि किती नागरिकांना याचा लाभ मिळावा यासाठी शासनाने पूर्ण पारदर्शकपणे माहिती जाहीर करावी. यासह मागण्यापूर्ण करण्यासाठी भूम तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 

यावेळी  विधानसभा समन्वयक दिलीप शाळू महाराज ,भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे ,महिला जिल्हा संघटिका जिनत सय्यद ,शिवसेना विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे,विहंग कदम,महिला तालुका प्रमूख उमादेवी रणदिवे, शहरप्रमुख प्रकाश  आकरे, महिला शहरप्रमुख ज्योती आडागळे, रोहिणी गपाट, श्रीकांत केदारी, सरफराज कुरेशी, आजित तांबे, मनोज फुसके, रामदास म्हेत्रे, दतात्रय शिंदे, नामदेव शेळके, शहनाज पठाण ,प्रतिक रणदिवे,प्रभाकर डिसले,श्रीधर गपाट, दादाराव जोगदंड, ढगे विकास, अमोल पंडित,  देवराज खोबरे, विशाल पाटोळे, मुंडेकर दीपक, श्रीमंत भडके, संजय नायकींदे उपस्थित होते.


 
Top