तेर (प्रतिनिधी ) धाराशिव जिल्हात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंत भक्ते (तेर) यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे अत्यंत भीषण असा कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.त्यामुळे बळीराजाला  असू मोठ्या संकटाना सामना करावा लागत आहे.सध्या सर्वात गंभीर परिस्थिती पशुधनाची झाली आहे. शेतातील उभी पीके जळाल्यामुळे जनावरांसाठी चारा शिल्लक राहिलेला नाही तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णतः आटून गेले आहेत. त्यामुळे जनावरे दगावण्याची व आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.सध्या जिल्ह्यातील पाऊस अनेक दिवसांपासून नसल्यामुळे जिल्ह्यात भीषण समस्या झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यासाठी आपल्या स्तरावरून वरिष्ठांस आदेशित करावे व जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंत भक्ते(तेर) यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top