तेर( प्रतिनिधी ) संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे धाराशिव तालुका अध्यक्ष भारत पाटील व नागरिकानी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, संपूर्ण पिक करपून गेले आहे एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, धाराशिव तालुक्यातील जागजी ते कोळेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,भंडारवाडी येथे लाईटचे सब स्टेशन करण्यात यावे,भंडारवाडी गावातील लावण्यात आलेले सर्व स्मार्ट मिटर वीज बिल नाही भरल्यास अॅटोमॅटीक वीज पुरवठा बंद होत आहे त्यामुळे सदरील स्मार्ट काढून पूर्वी प्रमाणे मिटर लाऊन देण्यात यावेत, शेतकऱ्यांना तात्काळ नविन कर्जाचे वाटप करण्यात यावे.या मागण्याचा विचार नाही केल्यास शेतकरी व ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे शेतकरी संघटनेचे धाराशिव तालुका अध्यक्ष भारत पाटील व नागरिकानी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 
Top