भुम (प्रतिनिधी)-  ईट व परिसरातील चांगले आलेले सोयाबीन मागील 40 दिवसापासून पाऊस न पडल्यामुळे सोयाबीनचे झाडे व शेंगा पूर्णपणे करपून गेले आहे, मार्च पेक्षाही जास्त ऊन पडत असल्यामुळे, परिसरातील सर्व पिके करपून गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर  सोयाबीन शेताच्या बाहेर काढणे परवडत नसल्यामुळे पेटून देत आहेत, पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून शासनाने तत्काळ अनुदान व पिक विमा, वाटप करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

दि. 4 सप्टेंबर रोजी भूम उपविभागीय अधिकारी, तहसीलदार भूम, शास्त्रज्ञ कृषी विघावेत्ता आंबेजोगाई, तालुका कृषी अधिकारी भूम,आय आय टी मुंबई, यांनी कमी पर्जन्यमान व पावसाचा खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थितीचा संयुक्त आढावा घेतला त्याचा अहवाल शासनास दाखल ही झाला. परंतु या अहवालामध्ये किती टक्के पिकांचे नुकसान झाले आहे याची माहिती प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. आता पुढे काय? याची  शेतकरी वर्ग  वाट पाहत आहे.

खरीप पिक विमा योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यासाठी ई- पीक पाहणी महत्वाचे असते काही शेतकऱ्यांची पाहणी झालेली आहे. परंतु या कामावर तलाठी संघटनेने बहिष्कार घातल्यामुळे या कामास अंतिम मंजुरी प्रलंबित आहे. आतापर्यंत ईट परिसरात फक्त 46% टक्के काम पूर्ण झालेले आहे, संप लवकर न मिटल्यास शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू शकतो.


मी तीन एकर सोयाबीन ची पेरणी केली होती. सोयाबीन व शेंगा पूर्णपणे करपून गेले आहे. त्यामुळे मी सोयाबीन पेटवून देत आहे. शेतकऱ्यांना अनुदान व पिक विमा 100% शासनाने त्वरित द्यावा.

शंभुराजे देशमुख माजी उपसरपंच ईट.


माझी पूर्ण सोयाबीन व माळवे करपून गेले आहे, बोरला, विहिरीला पाणी नाही, आम्ही पिके कसे जगवणार, झालेले नुकसान पीक विम्यातून द्यावे, विमा कंपनी नेहमी नुकसान द्यायचे टाळाटाळ करते.

मारुती माळी, शेतकरी ईट

 
Top