मुरूम (प्रतिनिधी)- येथील दिवंगत काशिनाथ सावंत यांच्या वारसाला साजेसा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवत, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत यांच्या नातीचा  कुटुंबाने एक आदर्श पायंडा पाडला आहे. प्रगतीशील युवा शेतकरी मुकुल सावंत यांची कन्या आणि गीताई मोबाईल शॉपीचे मालक अतुल सावंत यांच्या पुतणी कु. क्रांती मुकुल सावंत हिचा पहिला वाढदिवस नुकताच गुरुवारी (ता. 24) रोजी अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसासारख्या कौटुंबिक आनंदातही समाजातील गरजू घटकांचा विचार करून स्तुत्य उपक्रम घेतला. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरूम परिसरातील 5 गरजू महिला भगिनींना ब्लँकेटचे वाटप. कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संजय सावंत हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी आपल्या नातीच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ औपचारिकता न पाळता, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून एका नव्या 'क्रांती'चा जागर घातला.

सध्याच्या दुष्काळजन्य व कठीण परिस्थितीत, असे सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. सावंत कुटुंबीयांच्या या संवेदनशील भूमिकेबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, वाढदिवस कसा साजरा करावा, याचा एक उत्तम आदर्श या निमित्ताने मुरूम शहरात घालून दिला गेला आहे.


 
Top