धाराशिव (प्रतिनिधी)- नारायणी महिला सहकारी पतसंस्था धाराशिव ची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल रोमा पॅलेस धाराशिव येथे संस्थेचे चेअरमन सौ उमा अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव श्री रामदास सुभाष कोळगे व जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री मधुकर जाधव होते प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या उपाध्यक्ष कुमारी मोनाली जयपाल शेरखाने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कडप्पा शेरखाने, विठ्ठल सहकारी पतसंस्था धाराशिव चे चेअरमन विक्रम माणिकराव पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार प्रतापराव गवारे, नितीन बप्पा शेरखाने, बालाजी इतबारे संस्थेचे मार्गदर्शक श्री सय्यद सरशाद अब्दुल रजवी, संस्थेचे लेखा परीक्षक श्री भोसले हे मंचावर उपस्थित होते. सभेचे सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून आई तुळजाभवानी व विद्येची देवता सरस्वती यांच्यासमोर दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. संस्थेच्या अहवालाचे वाचन संस्थेचे सीईओ तथा संस्थापक श्री अरुण श्रीमंत पवार व सहकार विकास अधिकारी श्री मधुकर जाधव यांनी केले. संस्थेबद्दल विक्रम भैया पाटील, नितीन बप्पा शेरखाने, नंदकुमार गवारे, राजेंद्र शेरखाने व शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रामदास कोळगे यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या प्रगतीबद्दल व यशाबद्दल शुभेच्छा पर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक तथा मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव चे जिल्हाध्यक्ष श्री जयपाल शेरखाने सर तर संस्थेच्या चेअरमन सौ उमा अरुण पवार आपले अध्यक्षीय भाषण करून उपस्थित आमचे आभार प्रदर्शन केले.
