धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या महिला सक्षमीकरण, अंतर्गत तक्रार निवारण विभाग आणि धाराशिव शहर पिंक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर संपन्न झाले आहे.
यावेळी डी.वाय.एस.पी अश्विनी भोसले यांनी विद्यार्थिनींना समाजात वावरताना भिती न बाळगता आत्मविश्वासाने जगण्याचा व आपल्या ध्येयावर लक्ष देण्याचा संदेश दिला. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश बनसोडे,पिंक पथक, जिल्हा नोडल अधिकारी, पोलीस निरीक्षक इक्बाल सय्यद यांनी पोलीस नियंत्रण कक्ष, भरोसा सेल,ऍंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, पिंक पथक विभाग याबाबत माहिती दिली. नियंत्रण कक्षाबाबत महिला सुरक्षेसाठी 112 या हेल्पलाईन बद्दल संदिप सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या कार्याबाबत सुनील सोनटक्के यांनी माहीती दिली. तर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्याबाबत ए.पी.आय देशमुख व एच.सी 1451 पीरजादे यांनी मार्गदर्शन केले. सायबर सेल बाबत महिला कर्मचारी शेख,काझी यांनी माहिती दिली,सदर कार्यक्रमास पी.एस.आय राकेश बनसोडे, सोनकांबळे यांनी उत्तम सहकार्य केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थिसह महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ स्वाती जाधव, डॉ सी.आर दापके, सह समन्वयक शिल्पा डोळे,पी.एस आय माळी, सुधीर तुगावकर, श्रीशैल कट्टे, बी.डी.मडावी तसेच महाविद्यालयीन महिला कर्मचारी सदस्य प्रा .शितल शिंदे, मेघा अंगारखे, डॉ शितल गायकवाड, डॉ वैशाली बोबडे, प्रा सुवर्णा गेंगजे, प्रा.कोरे, सुवर्णा वाघमारे, प्रा थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
