तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील श्री मुद्गुलेश्वर शंभू महादेव मंदिरात रविवार दि 6 सप्टेंबर रोजी श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिनाभर सुरू असलेल्या या भक्तिमय सोहळ्याची सांगता रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी महादेवाच्या भव्य वरातीच्या आकर्षक देखाव्याने करण्यात आली. यावेळी हजारो शंभू महादेव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यानिमित्ताने मुद्गुलेश्वर सेवा समिती व युवा प्रतिष्ठान वतीने  15 हजार भाविकांना चपाती, शेवगा, आमटी, बुंदी जामुन, खारी बुंदी, पापड, गरगट्टा, बटाटा वांग मिक्स भाजी असा महाप्रसादाचा भाविकांनी वाटप करण्यात आला. अन्नदानाच्या उपक्रमातून श्रावण मासाच्या धार्मिक सोहळ्याची भक्तिमय सांगता करण्यात आली. श्रावण महिनाभर विविध महापूजा, आरास, महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भक्तीचा जागर करण्यात आला. या उपक्रमासाठी श्री मुद्गुलेश्वर सेवा समिती, युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविकांचे सहकार्य लाभले.

 
Top