धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय प्रकल्प - संकल्पनेपासून पूर्ततेपर्यंत या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी, डॉ.संदीप लोखंडे,कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्यासाठी क्षेत्रीय प्रकल्प हे परिणामकारक व प्रभावी माध्यम आहे, वर्गात शिकवलेल्या संकल्पना प्रत्यक्ष क्षेत्रातील परिस्थितीशी जोडणे, समस्या ओळखने, माहिती संकलित करणे, विश्लेषण करणे व निष्कर्ष मांडणे यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास होतोच त्याचबरोबर त्यांच्या व्यवहारिक संकल्पना सुध्दा स्पष्ट होतात,आज ए.आयच्या काळात अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन डॉ.लोखंडे यांनी यावेळी केले.याप्रसंगी प्र प्राचार्य डॉ सी.आर दापके यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ बालाजी नगरे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अमर निंबाळकर,प्रा मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.सूत्रसंचालन डॉ.अवधूत नवले यांनी केले.सदर राष्ट्रीय कार्यशाळा प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाली.आभार प्रा आकाश कांबळे यांनी मानले.कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top