भुम (प्रतिनिधी)- दि. 28/29 सप्टेंबर रोजी धाराशिव येथे झालेल्या जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटातून. कुमार बाडेवाले अब्दुला याने 80 मी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर मोटे संजना हिने दुसरा क्रमांक प्राप्त केला. तसेच 17 वर्ष वयोगटातून कुमार दराडे शशिकांत याने 110 मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला व क्रांती खांडेकर हिने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या वरील सर्व विद्यार्थ्यांची लातूर येथे  होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किरण जाधव, शाळेचे पर्यवेक्षक पोपट बांगर सर क्रीडाशिक शिंदे सर , मिसाळ सर यांनी सत्कार केला . यावेळेस प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top