धाराशिव (प्रतिनिधी)- धारासुर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव या संस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात बुधवार दि. 23/9/26 रोजी संस्थेचे अध्यक्ष योगेश संभाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाली या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून सहकार प्रशिक्षण अधिकारी लाभले

संस्थेचे अध्यक्ष योगेश संभाजीराव जाधव सर्व पाहुण्यांच्या व संचालकांच्या हस्ते गणेश पूजन व लक्ष्मीपूजनाने सभेस सुरुवात झाली अहवाल वर्षात दिवंगत झालेले सैनिक, साहित्यिक, विचारवंत, थोर नेते, संस्थेचे दिवंगत सभासद यांना दोन मिनिट उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कामकाजास सुरुवात झाली

 आज दि. 23/9/26 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भाऊ जाधव यांनी संस्था उभारणीस अनमोल सहकार्य केले व त्यातूनच गोरगरिबांना मदत केली त्यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सहकार प्रशिक्षण अधिकारी मधुकर जाधव यांचा सत्कार अध्यक्ष योगेश जाधव यांनी केला तसेच उत्कृष्ट ठेवीदार नियमित कर्जदार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

अहवाल वाचन करताना अध्यक्ष योगेश जाधव यांनी सांगितले की संस्थेकडे मार्च 2026 अखेर भाग भांडवल 83,39,106/- झाल्याचे व संस्थेने अहवाल वर्षात 5,18,64,358/- एक एक कर्ज वाटप केले असून संस्थेचा निधी रु3,05,41,666.35 इतका असून संस्थेचा नफा रु18,55,747/- झाला असून सभासदांना 11 % लाभांश जाहीर केल्याचे सांगितले

सभेत सरकार प्रशिक्षण अधिकारी मधुकर जाधव यांनी मार्गदर्शन करताना संस्थेने ठेवीच्या तुलनेत कर्जवाटप वाढवावे व जुन्या करदारांची वसुली करावी जेणेकरून आपला ताळेबंद स्वच्छ होईल आणि कर्जदारांनी वेळेवर कर्ज भरण्याचे आवाहन केले व त्यांनी संचालक कर्मचारी व सभासद यांना विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी संक्षेप ठेव प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले तेरकर आर बी यांनी केले व आभार संचालक नितीन नायर यांनी केले.

 
Top