धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये प्रथम घटक चाचणी परीक्षेत 120 पैकी 120 ते 110 गुण घेतलेल्या इयत्ता निहाय वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थी याचा सत्कार करण्यात आला. इ. 5 वी 51 विद्यार्थी, 6 वी 65 विद्यार्थी, इ.10 वी 51 विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर, पेन, शालेय उपयुक्त साहित्य बक्षीस स्वरूपात प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुअ प्रमोद कदम, पर्यवेक्षक के.के. पाटील,बी.बी.गुंड, के.जी. निकम,बी.एम. गोरे,आर .बी.जाधव, एस.डी.वाघ इ.5 वी. गुणवत्ता प्रमुख ए.एच. माने यांच्याहस्ते देण्यात आले. सदर बक्षीस वितरण समारंभ यशस्वीतेसाठी इयत्ता निहाय सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर सेवक महादेव काळे , प्रशांत जाधव आदि सेवक वृंदानी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन एस.एच. जगताप ,डी.यु. ओव्हाळ यांनी केले तर आभार राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ यांनी मानले.
