धाराशिव (प्रतिनिधी)- रुईभर ता. धाराशिव येथील स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ आबा कोळगे सोसायटीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे मंगळवारी दि 15 रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास सुभाषराव कोळगे यांनी दिली आहे. सदरील स्पर्धेतील विषय राजकारण : समाजसेवेचे माध्यम की सत्तेचे साधन, आजच्या तरुणा समोरील खरे आव्हान बेरोजगारी की दिशाहीनता, तरुणाईच्या हातात मोबाईल आहे की परिवर्तनाची मशाल अशा तीन विषयावर स्पर्धा असणार असुन प्रथम बक्षीस 1001 द्वितीय बक्षीस 701 तृतीय बक्षीस 501 चतुर्थ बक्षीस 301 अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांना सात मिनिटांचा वेळ देण्यात येईल सदरील स्पर्धा या रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येतील. तरी या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे सोसायटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.