धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस गुरुवर्य के . टी . पाटील सरांच्या ९७ व्या जयंती निमित्त सलग दुसऱ्या वर्षी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .
या विज्ञान प्रदर्शनास जिल्हातील शेकडो विदयार्थ्यांनी आपले प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले - यामध्ये सौरऊर्जा पासून जैव विविधता या विषयावर प्रयोग सादर करण्यात आले होते .
प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के .टी . पाटील , कै . भागिरथी केशव पाटील , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , सी . व्ही . रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख संतोष देशमुख यांनी करताना मुले प्रयोगातून विज्ञानाचे धडे उत्तमरित्या अवगत करतात असा विचार मांडला तर प्रमुख पाहुण्यां नी या प्रदर्शनास शुभेच्छा देताना त्यांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले .
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील पाटील , संस्था सचिव प्रेमाताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , डॉ. सौ . मंजुळाताई आदित्य पाटील ,युवा उद्योजक अभिराम पाटील , डॉ. सौ तनया अभिराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
तर या प्रदर्शनास प्रमुख उपस्थिती डॉ.विलास रावत , प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संजय देशमाने, फिजिशियन डॉ.विशाल वडगावकर , इंजि . राहुल गवळी, संस्था सदस्य पी .एल .गाडे , संतोष कुलकर्णी , के .टी .पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य अमोल जोशी ,
के .टी .पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य गजानन वाले , चंद्रमणी चतुर्वेदी , प्राचार्य फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल , काकडे सर
तसेच प्राचार्य नंदकुमार नन्नवरे उपप्राचार्य संतोष घार्गे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम पर्यवेक्षक कुमार निकम ,राजेंद्र जाधव , केशव पाटील , बालाजी गोरे , शेषनाथ वाघ , श्रीमती बी . बी . गुंड व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
तर परीक्षक म्हणून अंदुरे शाम व्यंकटेश, शिंदे विष्णू , पाटील जे. एस., पवार एल. व्ही . , वाघमारे एस .के, संकपाळ के .पी . , तेली एस .एल. यांनी काम पाहिले . प्राथमिक व माध्यमिक गटात पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीसे अनुकमे सात ,पाच व तीन हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन दि . ११ सप्टेंबर रोजी गौरविण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुवर्य के .टी . पाटील फांउडेशनचे पर्यवेक्षक शरद क्षीरसागर तसेच विज्ञान विभाग प्रमुख संतोष देशमुख , विज्ञान शिक्षक , विज्ञान शिक्षक विशालकुमार, श्यामजी मिश्रा, अमेर देशमुख व कु. ज्योतिसिंग राजपूत व समन्वयक सिताराम दिरगुळे यांचे योगदान मोलाचे ठरले .तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना देशमुख व जयमाला शिंदे यांनी केले .
