धाराशिव (प्रतिनिधी)-  खोटे सोन्याचे बिस्कीट देवून वृध्दांचे दागिने लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिं 01 ऑगस्ट  रोजी फिर्यादी निनाबाई चौगुले या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे आल्या असता. काही इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवून खोटे सोन्याचे बिस्किट देवून त्याबदल्यात त्यांचे सोन्याचे दागिने घेवून फसवणूक केली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व पथकाने आरोपी ऋषीकेश बंडू जाधव  रा. गांधी नगर, तेलगाव नाका, बीड याच्यावर पाळत ठेवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हयाबाबत माहिती दिली. तसेच अन्य साथीदारांची नावे सांगितली. पोलीसांनी सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेले मोटार वाहन असा एकुण 4 लाख 65 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस वैदयकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे तुळजापुर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद  इज्ज्पवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी,  पोह फरहान पठाण तसेच चापोह रत्नदीप डोंगरे, चापोह नागनाथ गुरव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


 
Top