धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले गवळी गल्लीतील ,धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते. 40 युवकांनी व पाच युवतीने रक्तदान केले यावेळी अवयवदान, देहदान, नेत्रदान अन्नदान हे मंडळ सातत्याने प्रयत्न करणारे मंडळ आहे.याचा प्रसार व प्रचार फॉर्म वाटप करून शासकीय रुग्णालयामध्ये जमा करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले .
याचवेळी प्रतिज्ञा संकल्प युवकानी घ्यावे व राष्ट्र बलवान करावा.व्यसनमुक्त युवक व नशा मुक्त भारत, पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्त देश असे पत्रक वाटप करून राष्ट्र, समाज, कुटुंब याचे संरक्षण व स्थिरता निर्माण होत असते ,असे रक्त संक्रमण अधिकारी व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व स्टाफ यांनी हे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सुंदर कांड.... राजस्थानी सत्संग मंडळ, मारवाडी समाज, माहेश्वरी समाज यांच्या चमुने सुंदरकांड अत्यंत जोश पूर्ण व भक्तीमय वातावरणामध्ये सतत अडीच ते तीन तास सादर केले. विष्णुदास सारडा, कुदाळ, खंडेलवाल ,बांगड ,राजकुमार राजूरकर ,वडगावकर असे20 व्यक्तींचा समावेश होता.
येडशी येथील राहुल महाराज येडशीकर वारकरी शिक्षण संस्था मोफत शिक्षण अध्यात्मिक धार्मिक शिक्षण विद्यार्थ्यांची राहण्याची सोय भोजन मोफत देण्याची व्यवस्था केली आहे. आजच्या स्पर्धे युगामध्ये तांत्रिक शिक्षण , सत्संग ,आध्यात्मिक संत सेवा करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या या छोट्या बालकांच्या 30 वारकऱ्यांनी आपलं टाळ मृदुंग या वादनातून पावले खेळत व टाळ वाजवत चार तास भक्तीमय,आनंदीमय वातावरण निर्माण केले होते.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीने व्यसनमुक्त युवक नशा मुक्त भारत निर्माण करण्यासाठी "''' सोडूनी दारूची वाईट चाल""'" या गीतातून व्यसनमुक्तीचा संदेश मंडळाच्या व्यासपीठावरून देण्यात आला.
श्री ची पूजा विधि संपन्न केली. मंडळांनी या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीश पाळणे, काशिनाथ दिवटे, विश्वास दळवी ,नंदकुमार हुच्चे, वरून साळुंखे, केदार उपाध्ये, सालपे ,ओम गवळी ,श्रीकांत दिवटे ,सचिन बुरुंग, मनोज गवळी, विद्यानंद साखरे ,दत्ता वाडकर, अतुल ढोकर , दत्ता वाडकरइत्यादीने परिश्रम घेतले शेवटी भारत माता की जय, वंदे मातरम ,गणपती बाप्पा मोरया, संत ज्ञानेश्वर तुकाराम राम कृष्ण हरी इत्यादीच्या घोषणा देऊन समारोप करण्यात आला .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र हुच्चे व राजकुमार दिवटे यांनी केले.

